नांदेड : नांदेड महापालिकेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झालाय. येत्या ११ ऑक्टोबर रोजी नांदेड महापालिकेसाठी मतदान होणार आहे. १६ ते २३ सप्टेबर दरम्यान नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी छाननी तर २८ सप्टेंबर रोजी निवडॅणुक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर १२ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
नांदेड महापालिकेच्या ८१ जागांसाठी प्रभाग निहाय पद्धतीन निवडणूक होणार आहे. ४ उमेदवारांचा एक प्रभाग असेल. नांदेड हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचे होमग्राउंड असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल.
भाजपाने या निवडणुकीत मोठी ताकद लावण्यासाठी फिल्डींग केलीये. आतापर्यंत भाजपाने सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांनी राजीनामे द्यायला लावून आपल्या जाळ्यात ओढलय. शिवाय भाजपाने जोरदार फिल्डींग सुरु केलीये. त्यामुळे अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक त्यांची परिक्षा घेणारी ठरणार आहे.
दरम्यान नांदेड महापलिकेसाठी पहिल्यांदाच व्ही पी टी मशिन्सचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार निवडणूक विभागाने तयारी केलीये. निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार व्ही पी टी मशींन्सबाबत मतदारांमध्ये जाऊन माहिती दिली जाणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.