Madha Loksabha Political Scenario : माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा मधील माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) आणि माजी आमदार जयवंत जगताप यांचे पुत्र वैभवराजे जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. करमाळा तालुक्यातील शिंदे गटाचे नेते माजी आमदार नारायण पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आलं होतं. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. सध्या भाजप सोबत असलेले माजी आमदार जयवंत जगताप यांचे पुत्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते करमाळा माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप (Vaibhav Raje Jagtap) यांनी मोहिते पाटील यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे करमाळयात मोहिते यांची ताकत अधिक वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय.
काय म्हणाले नारायण आबा?
मी गेली 10 वर्षे मोहिते पाटील यांच्यासोबत आहे. यावेळी लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत राहणार आहे. यावेळी त्यांच्या गटाचे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य तुतारी हाती घेईल, असं नारायण आबा म्हणाले. नारायण पाटील 26 एप्रिल रोजी करमाळा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
मिल बैठेंगे तीन यार...!
दरम्यान, आज अकलूजमधील शिवरत्न या मोहिते पाटील यांच्या बंगल्याला पुन्हा राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. जुने मित्र शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत विजयसिंह मोहिते पाटील एकत्र स्नेह भोजनाचा आनंद घेणार आहेत. अनेक वर्षानंतर एकत्र आलेले मित्र भोजन निमित्त असले तरी राजकीय स्नेह वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय. सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री आणि विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री हा सुवर्णकाळ महाराष्ट्राने 2003 साली पहिला आहे. जर ही दोन राजकीय घराणी पुन्हा हातात हात घालून काम करू लागली तर सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणाची कुस बदलणार आहे. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये एकत्र असताना सुशीलकुमार सोलापूर शहराचे राजकारण पाहायचे तर विजयसिंह सोलापूरच्या ग्रामीण भागावर पकड मजबूत ठेवून होते. जर मतदारांनी साथ दिली तर पवारांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील राजकारण मोहिते आणि शिंदे यांच्या ताब्यात जाऊ शकते.
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या मोहिते-पाटलांनी भाजपविरुद्ध दंड थोपटले होते. गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीनंतर देखील मोहिते पाटलांनी तह केला नाही अन् माढ्यातून तुतारी हाती घेतली. त्यामुळे आता शरद पवार यांच्या हाती माढ्याची जागा फिक्स असल्याचं बोललं जातंय.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.