close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मी लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार- नारायण राणे

मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.

Updated: Sep 17, 2019, 06:21 PM IST
मी लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार- नारायण राणे

सिंधुदुर्ग : मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. आज सिंधुदुर्ग येथे त्यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान आलेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. 

मुख्यमंत्र्यानी मला शब्द दिलाय, माझा त्यांच्यावर विश्वास आहे ते शब्द पूर्ण करतील असेही राणे यावेळी म्हणाले. सेना भाजपा युती संदर्भात त्यांना यावेळ प्रश्न विचारला गेला. त्यावेळी भाजपा-सेनेत काय होईल ? मला माहित नाही मात्र माझा भाजप प्रवेश निश्चित आहे असे ते म्हणाले. युतीबाबत तुम्ही मुख्यमंत्र्याना विचारा असेही त्यांनी म्हटले. 

पुत्र नितेश राणे कनकवलीतून भाजपकडून निवडणूक लढणार असल्याचेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणाकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.