नाशिक गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणात नवा खुलासा, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले मृत्यूचे कारण

Nashik Pregnant Women Death: गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा, महिलेला प्रसूती पूर्व वेदना नसल्याचा दावा

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 27, 2023, 03:31 PM IST
नाशिक गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणात नवा खुलासा, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले मृत्यूचे कारण title=
Nashik as pregnant woman dies en route to hospita collector gives information

योगेश खरे, झी मीडिया

Nashik News Today: जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये गर्भवती असलेल्या महिलेच्या प्रसुती वेदना सुरू झाल्याने रस्त्याअभावी तिचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी आता नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळाच दावा केला आहे. महिलेला प्रसूतीपूर्व वेदना नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी महिलेने किडनी स्टोनसाठी एका वैदूच औषध घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik Pregnent Women Death)

नाशिक जिल्हाधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत असून त्यांनी महिलेला प्रसूती वेदना नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तिची प्रसूतीची तारीख 9 सप्टेंबर असल्याचं रेकॉर्डवरून दिसून येत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

शासकीय प्राथमिक रुग्णालयात तिची तपासणी झाल्याचे पुरावे आढळून आले आहेत. तरीही नेमका तिचा मृत्यू विसेरातील अहवालानंतर मिळू शकेल, असं सांगत याबाबतची संपूर्ण सखोल चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केलं आहे. 

काय घडलं नेमकं?

इगतपुरीच्या तळोघ जुनवणेवाडी येथील गरोदर महिलला रस्ता नसल्याने प्राण गमवावा लागला असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. वनिता भाऊ भगत असे मयत महिलेचे नाव आहे. प्रसूतीच्या वेदना होत असल्याने संबंधित महिलेला नातेवाईकांसह मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अडीच किलोमीटर पायपीट करत दवाखान्यापर्यंत पोहोचली होती. मात्र पायपीट, प्रसुतीवेदना आणि पाऊस यामुळे झालेल्या विलंबामुळे आपल्या आई वडिलांसोबत ती घोटी येथील शासकीय रुग्णालयात गेली. त्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात या महिलेने दवाखान्यात प्राण सोडला, असं समोर आले होते. 

गर्भवती महिलेसोबत तिच्या अर्भकाचाही मृत्यू झाला आहे. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात वनिता यांनी प्राण सोडला. मात्र आता या प्रकरणाला धक्कदायक वळण आले आहे.