नाशिकमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींवर पोलिसांची कारवाई

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या नाशिक पोलिसांनी आपला मोर्चा सध्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडे वळवलाय. पार्कमध्ये, गार्डनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना हेरून त्यांच्या पालकाकडे सुपूर्द केलं जातंय.

Updated: Dec 17, 2017, 11:30 PM IST
नाशिकमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींवर पोलिसांची कारवाई  title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या नाशिक पोलिसांनी आपला मोर्चा सध्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडे वळवलाय. पार्कमध्ये, गार्डनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना हेरून त्यांच्या पालकाकडे सुपूर्द केलं जातंय.

(बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

जॉगिंग ट्रक किंवा मैदानावर येणा-या ज्येष्ठ नागरिकांना सध्या वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागतंय. ती म्हणजे महाविद्यालयीन तरुण तरुणींचा सार्वजनिक ठिकाणचा आक्षेपार्ह वावर... 

शहरातल्या पार्क आणि मैदानांवर हेच चित्र दिसतंय, अशा तक्रारी वाढल्यात. ही समस्या सोडवण्यासाठी आता पोलीस पुढे सरसावलेयत. अशा जोडप्यांना पकडून थेट त्यांच्या पालकांशी संपर्क साधला जातो. 

काही तरुण तरुणींना मात्र हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य़ावरचा घाला वाटतोय. तर कुणी या वर्तणुकीला विरोधही करतोय. 

पोलिसी कारवाई होतेय म्हणून अशा जोडप्यांचं समर्थन करणारे पोलिसांचा विरोध करतायत. पण, गोदापार्क परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढलेयत. त्यामुळे प्रत्येकानं सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करण्याची गरज निर्माण झालीय.

सार्वजनिक ठिकाणी जोडप्यांचा आक्षेपार्ह वावर