Crime News : आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर हे आपण अनेकवेळा ऐकलं असेल. आईला देवासमान मानलं जातं, कारण आईसारखं प्रेम आपल्यावर कोणीच करत नाही. मात्र एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नवी मुंबईमधील एक आई तिच्याच दोन मुलांच्या जीवावर उठली. आईने तिच्या मुलीची आणि मुलाची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेने घणसोली गावात खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime News)
नेमकं काय आहे प्रकरण?
नवी मुंबईमधील घणसोली गावातील एका आईने तिच्या दोन मुलांची हत्या केली आहे. यामध्ये एक चार वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. मुलांच्या आईने दोघांना गळा दाबून जीवे संपवलं आहे मात्र आरोपी महिलेने हे पाऊल का उचललं याबाबत कोणतीही महिती समोर आली नाही.
इतकंच नाहीतर संबंधित महिलेने मुलांची हत्या करून त्यांना वाशी मनपा रुग्णालयात आणलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.