Ajit Pawar : जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया केली आहे. 

Updated: Nov 14, 2022, 12:46 PM IST
Ajit Pawar : जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया title=

Ajit Pawar on Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये. ( Maharashtra Politics) आव्हाड यांनी काहीही चुकीचं केलं नाही, असं विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं. जे काही घडलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर घडले आहे. त्यामुळे आव्हाड यांनी काहीही चूक केलेली नाही, हे मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. (Jitendra Awhad woman molestation case)

आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत विनयभंगाचा गुन्हा झाला. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी 72 तासात पोलिसांनी दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. (maharashtra political news) तसेच पोलीस अत्याचाराविरुद्ध लढणार असल्याचे सांगत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषण केली. तसे त्यांनी ट्विट केले.  यानंतर अजित पवार यांनी म्हटले की, माझी पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, अशाप्रकारे त्यांनी राजीनामा देऊ नये. तसा विचारही त्यांनी मनात आणू नये. .(अधिक वाचा - आमदार जितेंद्र आव्हाड अडचणीत, महिलेने केला गंभीर आरोप)

 त्यांनी राजीनामा देऊ नये - सुप्रिया सुळे

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.  माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, राजीनामा हे यावरचं उत्तर नाही. ते एक भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये. कारण, ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत, सुप्रिया सुळे म्हणाल्या.  (अधिक वाचा - जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा)

आव्हाड यांचा निर्णय पक्षाला मान्य नाही - पाटील

तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदारकीचा राजीनामा देण्याचा आव्हाड यांचा निर्णय पक्षाला मान्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. याचा अर्थ लोकांना समजला आहे. आव्हाड यांना बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा आरोप यावेळी जयंत पाटील यांनी केला आहे.