अजित पवार यांनी स्टेजवर गाणं गात उडवली धम्माल... नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या, पाहा Video

दमदार भाषण करणाऱ्या अजित पवार यांनी स्टेजवर गाणं गाताच कार्यकर्त्यांनी टाळ्या शिट्ट्या वाजवत दिली दाद

Updated: Oct 1, 2022, 04:59 PM IST
अजित पवार यांनी स्टेजवर गाणं गात उडवली धम्माल... नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या, पाहा Video title=

Ajit Pawar Song : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं भाषण म्हणजे एरवी कार्यकर्त्यांसाठी पर्वणी असते. मात्र यावेळी अजित पवारांनी धाराशिवमधील (Dharashiv) एका कार्यक्रमात  स्टेजवर चक्क हिंदी गाणं गायलं. त्यांचं भाषण सुरू असताना त्यांना एकामागून एक चिठ्ठ्या देण्यात आल्या. तेव्हा घे रे त्याची चिठ्ठी असं म्हणत त्यांनी स्टेजवर 'चिठ्ठी आयी है' हे गाणं गायलं. यावेळी कार्यकर्त्यांनीही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत त्यांच्या गाण्याला दाद दिली.'

पण यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनी दिलेलील चिठ्ठी वाचत तक्रारीची दखल घेत कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं.  मी साखर आयुक्तांशी बोलतो. राणाचा असो किंवा कोणाचाही कारखाना असो, भाव दिलाच गेला पाहिजे, मी राणाशी पण बोलीन, राणा भाजपमध्ये गेला म्हणजे आमचं बोलणं बंद आहे अशातला भाग नाही. त्याला पण विचारेन की वस्तुस्थिती काय आहे" असं अजित पवार यांनी ही चिठ्ठी वाचल्यानंतर म्हणाले.

आधी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकणार
दसरा मेळाव्यात (Dussehra Melava) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं भाषण एकाचवेळी सुरु झालं तर कुणाचं भाषण ऐकणार असा सवाल अजित पवार यांनी विचारण्यात आला होता. यावर अजित पवार यांनी थेट उत्तर दिलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं भाषण एकाचवेळी सुरु झालं तर आधी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकणार नंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण असं उत्तर अजित पवार यांनी दिलं. शिवसेनेसोबत शेवटपर्यंत ऋणानुबंध जपू असंही ते म्हणाले.

फडणवीस यांचं अजित पवारांना उत्तर
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) 6 जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) झाल्याने टीका केली होती. 6 जिल्हे कसे सांभाळणार असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. तसंच लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याचं म्हटलं होतं. यावर फडणवीस यांनी उत्तर देताना एवढी तसदी घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने अजित पवार पाच सहा कारखान्याचा कारभार सांभाळतात, त्याच पद्धतीने सहा जिल्ह्याचा कारभार सांभाळता येतो असं फडणवीस म्हणालेत.