मुंबई : शिवसेनेसोबत कुठलंही बोलणं झालेलं नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक सुरु होण्यापुर्वी ते माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या जनतेला खूप अपेक्षा आहेत. सरकारमध्ये जायचे की नाही ? याबाबत राष्ट्रवादीमध्ये कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार आहे.
आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिलाय याच वाक्यावर राष्ट्रवादी ठाम होती. पण आता शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी ते अनुकूल दिसत आहेत. भाजपा सत्तेपासून दूर जात असून पुन्हा सत्तेत येत असल्याचा आनंद राष्ट्रवादी नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यादृष्टीने पाऊले उचलली जात आहेत.
ज्येष्ठ नेत्यांची भुमिका यामध्ये महत्त्वाची आहे. कारण पुढची रणनिती कशी असेल ? शिवसेनेसोबत गेल्यास जुळवून घेता येईल का ? याचा विचार केला जाईल.