NEET Scam: लातूर NEET पेपर फुटी प्रकरणातला बहुचर्चित आरोपी गंगाधर अखेर सीबीआयच्या हाती लागलाय. लातूरमधील दोघा शिक्षकांना हाताशी धरून त्यानं NEET गुणवाढीचं आमीष दाखवलं. लातूरच्या शिक्षकांच्या मध्यस्थीनं विद्यार्थी-पालकांकडून लाखो रुपये उकळले जायचे. नीट घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन याची फेरपरीक्षा घेण्यात आली. पण यात आणखी एक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. कुठे आणि काय घडलाय हा प्रकार? जाणून घेऊया.
'नीट' परीक्षेच्या निकालावरून देशभरात मोठा गदारोळ झाला. विरोधकांनी केंद्र सरकारला यावरुन धारेवर धरले. या प्रकरणाचा जाब विचारण्यात आला. दरम्यान यात आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. यवतमाळच्या आर्णी येथील भूमिका डांगे या विद्यार्थिनीने नीट ची झालेली फेरपरीक्षा दिली नव्हती. असे असतानाही तिला नव्याने गुणपत्रिका आली आहे. त्यात तिचे मार्क्स 640 वरून थेट 172 इतके खाली आले आहेत. परीक्षेतील या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थीनी भूमिका डांगेला जबर मानसिक धक्का बसला आहे. भूमिकाला पहिल्या परीक्षेत 640 गुण मिळाले होते आणि ऑल इंडिया रैंक 11 हजार 769 होती. पण अचानक आलेल्या या मार्कशिटमुळे तिला आता काय करावे हे सुचत नाहीय? दरम्यान या प्रकरणामुळे 'नीट' चा गलथन कारभार समोर आला आहे.
भूमिका हिने दुसऱ्यांदा झालेली परीक्षा दिली नव्हती. तरी तिला नव्याने गुणपत्रिका मिळाली. एकतर परीक्षाच दिली नसताना गुणपत्रिका यायलाच नको होती. त्यातही आधीच्या परीक्षेत मिळालेले गुण कमी करुन दाखवले.आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण 172 नी कमी झाले. कमी झालेल्या गुणांमुळे ती 11 हजाराच्या रॅकवरून थेट 11 लाख 15 हजार 845 व्या रॅकवर घसरली गेली आहे. एनटीएने ग्रेस गुण मिळालेल्या 1500 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली होती. या परीक्षेशी भूमिकाचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे तिने ही परीक्षा दिली नव्हती.
असे असतानाही पुनः परीक्षेच्या निकालानंतर तिची गुणपत्रिका बदलून मिळाली. ज्यात हा घोळ समोर आला. यानंतर भूमिका आणि तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकली. मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगल्याने पालक आता चिंतेत आहेत. याबाबत आम्ही एनटीएला ई-मेलही पाठविला पण त्यांच्याकडून काहीच प्रत्युत्तर आले नसल्याने आता काय करावे? असा प्रश्न भूमिकाचे वडील राजेंद्र डांगे यांनी उपस्थित केलाय.
सीबीआयनं गंगाधरकडून मोबाईल फोन आणि NEET परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं जप्त केलीत. त्या मोबाईलमधून फसवणुकीचे अनेक धक्कादायक प्रकार उजेडात आलेत. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले दोन शिक्षक आणि मध्यस्थ इरण्णा कोनगलवार यांच्या मतदीनं गंगाधरनं पेपरफुटीचं रॅकेट कसं चालवलं होतं, याचा पर्दाफाश होणाराय... गंगाधरला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय आता इरण्णाच्या मागावर आहे. तो हाती लागल्यानंतर NEET पेपरफुटी घोटाळ्याचं सगळा काळा कारभार उजेडात येण्याची शक्यता आहे.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.