खचलेला जगबुडी पुल लहान वाहनांसाठी खुला

छोट्या वाहनांसाठी पूल सुरु करण्यात आला आहे.

Updated: Aug 17, 2019, 01:43 PM IST
खचलेला जगबुडी पुल लहान वाहनांसाठी खुला title=

प्रणव पोळेकर, झी मिडिया, रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नवीन पुल अखेर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. नाट्यमय घडामोडीनंतर छोट्या वाहनांसाठी हा पूल सुरु करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावरचा जगबुडीवरचा नवीन पुल ऐन पावसाळ्यात खचल्याने वाहनधराकांचा मोठा खोळंबा झाला होता. मात्र हा पुल सुरु करण्यासाठी राष्ट्रवादीने आठ दिवसांपुर्वी अल्टिमेटम दिले होते. त्यामुळे आज राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, खेडचे आमदार संजय कदम, आमदार भास्कर जाधव या पुलाच्या पाहणीसाठी जगबुडीनदीवरच्या पुलावर पोहचले. 

पुल छोट्या वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो का? याचा आढावा त्यांनी घेतला. अखेर महामार्गाच्या अधिकाऱ्यांना खासदार सुनिल तटकरे यांनी स्वतःच्या गाडीत बसवत हा पुल पार करत, छोट्या वाहनांसाठी सुरु केला गेला. 

पावसाच्या सुरुवातीलाच हा पूल खचल्याने पुरपरिस्थितीत देखील वाहतूक ठप्प झाली होती. 

राजकीय श्रेयासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.