पिंपरी-चिंचवड : सासूकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या भीमनगरमध्ये घडलीये
महिन्याभरापूर्वीच पुष्पा लोखंडे हिचे लग्न झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सासू तिचा जाच करत होती. अखेर या छळाला कंटाळून तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली.
याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. दरम्यान, सासरी छळ होत असल्याचे आत्महत्येपूर्वी पुष्पाने सांगितले होते असे तिच्या माहरेच्यांनी सांगितलेय.