नितेश राणे यांचा अखेर भाजपात प्रवेश

मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्याच वेळी कणकवलीत नितेश राणे यांनी

Updated: Oct 3, 2019, 01:27 PM IST
नितेश राणे यांचा अखेर भाजपात प्रवेश title=

सिंधुदूर्ग : मुंबईत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेकडून वरळी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्याच वेळी कणकवलीत नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. नारायण राणे यांच्या आधी नितेश राणे यांचा भाजपा प्रवेश झाला आहे. नितेश राणे हे कणकवलीतून भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश होता. भाजपा कार्यालय हे नारायण राणे यांच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे.

नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध होता, आणि या विरोध लक्षात घेऊन, भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर नितेश राणे यांचा आज अखेर भाजपात प्रवेश झाला आहे.