विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही

बारावीच्या निकालांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश होतील, असं सरकारने जाहीर केलं आहे

Updated: Aug 4, 2021, 07:57 PM IST
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही title=

पुणे : कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा CET होणार नसल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उद्यापासून बारावीच्या निकालाच्या आधारेच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. 

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल काल लागला. यंदा राज्याचा सरासरी निकाल 99 टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? असे प्रश्न उपस्थित होत होते. पण राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंबरोबर झालेल्या बैठकीत प्रवेशासाठी CET घेतला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. 

तुकड्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येची आवश्यकता असेल, तर 31 तारखेआधी आमच्याकडे त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावेत असं सांगतानाच एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही असं आश्वासनही उदय सामंत यांनी दिलं आहे.

तसंच महाविद्यालयांचं पुढील सत्र ऑफलाईन पद्धतीने सुरु व्हावं यासाठी येत्या आठ दिवसात आढावा घेऊन निर्णय जाहीर केला जाईल अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे. 

दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी CET होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सीईटी परिक्षा या ऑनलाईन होतील. पण त्या सेंटरवर जाऊन द्याव्या लागतील. घरातून देता येणार नाहीत. त्यासाठी सीईटीची सेंटर्स वाढवण्याचा आमचा विचार आहे, अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे.