जादूटोण्याच्या संशयावरून अंगावर अ‍ॅसिड टाकून जीव घेतला; जालना येथील धक्कादायक प्रकार

जालना आणि पुण्यात दोन धक्कादायक घडना घडल्या आहे. जालना येथे जादूटोण्याच्या संशयावरुन एका वृद्धाची हत्या करण्यात आलेय. तर, पुण्यात एका वृद्ध महिलेची साडी वापरुन अघोरी पूजा करण्यात आली.

Updated: Sep 20, 2023, 06:56 PM IST
जादूटोण्याच्या संशयावरून अंगावर अ‍ॅसिड टाकून जीव घेतला; जालना येथील धक्कादायक प्रकार title=

Jalna Crime News:  जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाच्या अंगावर अंगावर अ‍ॅसिड टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्लयात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात 2 संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेत. तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीरंग शेजुळ असं मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचं नाव आहे.

अंगणात झोपलेले असताना जीवघेणा हल्ला

अंगणात बाजेवर झोपलेले असताना श्रीरंग शेजुळ यांचा अचानक ओरडण्याचा आवाज आला. त्यांच्या अंगावर द्रव पदार्थ टाकल्याचं आढळून आले. मात्र यावेळी आजूबाजूला कुणीही आढळून आलं नाही.त्यामुळे श्रीरंग शेजुळ यांना शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गावातीलच नंदू शेजुळ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. जाफ्राबाद पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पुण्यात जादूटोण्याचा प्रकार उघड

पुण्यात जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उच्चभ्रू असलेल्या कोथरूड तसेच जनवाडी इथं एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रॉपर्टीच्या कारणावरून आजी, मामा, सावत्र आई, भाऊ आणि चुलत बहीण यांनी घरातील महिलेची साडी चोरून साडीच्या बाजुला अंडी टाचण्या लावलेले लिंबू, भात, प्राण्याचे काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती ठेवुन करणीसाठी जादूटोण्याचा अनिष्ट व अघोरी कृत्य केल्याची घटना घडली आहे. याबाबत अनिकेत सुपेकर यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

कांता सुरेश चव्हाण वय 70, गिरीश सुरेश चव्हाण वय 35, संगीता सुपेकर वय 45, स्वप्नील सुपेकर वय 23, सोनल प्रवीण सुपेकर वय 30, देवरुशी स्वप्नील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या आजी, मामा, सावत्र आई, भाऊ आणि चुलत बहीण यांनी संगनमत करून कट रचून प्रॉपर्टीच्या कारणावरून तसेच फिर्यादी यांच्या वस्तीतील मुलगा कृष्णा चांदणे याने त्याचे पत्नीच्या कारणावरून फिर्यादीचे मामा यांना मारले होते. याचा राग मनात धरून महिलेच्या आईची साडी चोरली होती.त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांवर करणी करण्याचा कट रचला होता. त्यासाठी आईची साडी तसेच फिर्यादीची आई सुनिता सुपेकर, मावशी अनिता चव्हाण, काकु आशा सुपेकर व कृष्णा चांदणे याचे फोटो ठेवुन फोटोचे व साडीचे बाजुला अंडी, टाचणे लावलेले लिंबू, भात कसले तरी काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती ठेवुन करणी करता जादू टोण्याचे अनिष्ट व अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.