मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसला भीषण अपघात, एक ठार तर १६ जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ( Mumbai-Pune Expressway) एसटी बसला भीषण अपघात ( ST bus crash) झाला आहे. 

Updated: Nov 26, 2020, 08:30 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसला भीषण अपघात, एक ठार तर १६ जखमी

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ( Mumbai-Pune Expressway) एसटी बसचा भीषण अपघात ( ST bus crash) झाला आहे. अपघातात एक जण ठार तर चालकासह १६ जण जखमी झालेत. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

साताऱ्यातून मुंबईकडे बस निघाली होती. जखमींवर कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील मृत व्यक्ती हा मुंबईत बेस्टचा चालक असल्याची माहिती मिळत आहे. एसटीचे पनवेल आगार प्रमुख विलास गावडे आणि इतर कर्मचारी रुग्णालयात पोहोचलेत. जखमींवर योग्य उपचार मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आयआरबी आणि वाहतूक पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले आहे.