रत्नागिरी : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रत्नागिरी येथे बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा घोषित केला. त्यानंतर आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने मिशन लोटस हाती घेतल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रत्नागिरी येथे बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा घोषित केला. त्यानंतर आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने मिशन लोटस हाती घेतल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सात ऑगस्टपासून तीन दिवस अजय कुमार मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत विकासात्मक कामांचा आढावा घेणार आहेत.
विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाळीनंतर राऊत सध्या राज्यव्यापी दौरे करत आहेत.
आता भाजपने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने लोकसभा प्रवास योजना आखली आहे. त्यानुसार 16 लोकसभा मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केलं असून यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.
मागील पंधरा ते वीस दिवसांमध्ये भाजपचे नेते आशिष शेलार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आणि कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दौरा केलेला आहे.
त्यानंतर आता केंद्रीय गृहराज्यमंत्री देखील रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. त्यामुळे एकंदरीत भाजपची रणनीती आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्पष्ट होताना दिसत आहे.