मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची (2021) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विभिन्न विभागाअंतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 290 पदांच्या भरती करीता परीक्षा घेण्यात येणार आहे.
शासकीय भरतीसाठी MPSC तर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. त्यात महत्वाची मानली जाणारी राज्य सेवा परीक्षेची जाहिरात आयोगाने जारी केली आहे. या जाहिरातीमध्ये 290 पदांची भरतीची माहिती देण्यात आली आहे.
पदे.
वरील पदांसाठी आयोगाने जाहिरात जारी केली असून राज्य सेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतून उमेदवारांची निवड होणार आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 ऑक्टोबरपर्यंत आहे. आजपासून उमेदवार अर्ज भरू शकतात.