गंगाखेड साखर कारखान्याच्या संचालकांच्या अडचणीत वाढ

गंगाखेड साखर कारखान्यात झालेल्या पीककर्ज घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधारची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. यामुळे या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधारासह फैक्टरी संचालक, बँकेचे अधिकारी अडचणीत आलेत.

Updated: Aug 6, 2017, 04:11 PM IST
गंगाखेड साखर कारखान्याच्या संचालकांच्या अडचणीत वाढ title=

औरंगाबाद : गंगाखेड साखर कारखान्यात झालेल्या पीककर्ज घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधारची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. यामुळे या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधारासह फैक्टरी संचालक, बँकेचे अधिकारी अडचणीत आलेत.

बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड आणि अकोला जिल्ह्यातील सुमारे 29 हजार शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कागदपत्र देऊन तब्बल 328 कोटींचे पीककर्ज उचलण्यात आल्याचं उघड झालं आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. कोर्टानं महासंचालकांना विशेष चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अहवाल सादर केला. या आधारे या प्रकरणातल्या सूत्रधारांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश कोर्टानं दिलेत. या प्रकरणाची पुढली सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे.

व्हिडिओ