बंदूक दाखवून बलात्कार, महाराष्ट्रात रक्षकच झाले भक्षक

बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार, पोलिसाच्या जाचाला कंटाळून महिलेनं संपवलं आयुष्य

Updated: Mar 4, 2021, 12:32 PM IST
बंदूक दाखवून बलात्कार, महाराष्ट्रात रक्षकच झाले भक्षक

उस्मानाबाद: विधानभवनात औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद उमटत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रात रक्षण करणारेच भक्षक झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. 

विवाहित महिलेला जबरदस्ती घरी बोलवून बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. 

संरक्षण करणारेच भक्षकासारखे वागत असल्यानं आता न्याय मागायला कोणाकडे जायचं असा प्रश्न पडला आहे. तर या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक इथे ही घटना घडली.

पोलिसाने बलात्कार केल्यानंतर या महिलेनं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. या महिलेनं सुसाईड नोटमध्ये पोलिसाला जबाबदार धरावं असं म्हटलं आहे. 'बंदुकीचा धाक दाखवून घरी बोलवून त्यानं माझ्यावर बलात्कार केला. त्यात माझ्या नवऱ्याचा काय दोष? मी माझं आयुष्य संपवत आहे. त्यासाठी पोलीस दलात कर्मचारी असलेल्या या व्यक्तीला अटक करावी' असंही पीडित महिलेनं आत्महत्येपूर्वी उल्लेख केला आहे. 

पीडित महिलेनं आत्महत्या पूर्वी या महिलेने सुसाईट नोट  लिहून ठेवली. या सुसाईड नोटमध्ये आरोपी पोलिसांचा उल्लेख केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळी दोन वेगवेगळ्या आत्महत्या चिठ्या सापडल्या आहेत यामध्ये  जाचाला कंटाळून महीलेने हे आत्महत्येचे पाऊस उचलले हे लक्षात येत आहे. 

आरोपी उस्मानाबाद पोलीस दलात कर्मचारी असून या प्रकरणी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सध्या तपास सुरू असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.