पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले राज्यातील चित्रकार

 'एक चित्र पूरग्रस्तांसाठी

Updated: Aug 22, 2019, 03:50 PM IST
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले राज्यातील चित्रकार

पुणे | कोल्हापूर सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील चित्रकार पुढे सरसावले आहेत. 'एक चित्र पूरग्रस्तांसाठी ' या प्रदर्शनाच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत उभी केली जात आहे. पुणे आर्ट ग्रुपतर्फे बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. राज्यभरातील ३०० पेक्षा अधिक कलाकारांच्या उत्तमोत्तम कलाकृती त्यात ठेवण्यात आल्या आहेत. 

प्रदर्शनातील कुठलेही चित्र ५ हजार रुपयांना मिळणार आहे. त्यातून उभी राहिलेली रक्कम पूरग्रस्त भागातील शाळा तसेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला आहे. 

येत्या २६ ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन सुरु असणार आहे. रोटरी क्लब वाल्हेकरवाडीच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे.