Pandharpur Election Result 2021: राष्ट्रवादीला कडवी टक्कर, भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये प्रत्येक फेरीला बदलते कल, चित्र स्पष्ट होण्यास संध्याकाळ होण्याची शक्यता 

Updated: May 2, 2021, 10:42 AM IST
Pandharpur Election Result 2021: राष्ट्रवादीला कडवी टक्कर, भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

पंढरपूर: ममता बॅनर्जी पिछाडीवर गेल्या असून निकालात आता भाजपने आघाडी घेतल्याचं पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्रातही पंढरपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत प्रत्येक फेरीमधील कल बदलता पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अटीतटीची लढत सुरू आहे. आतापर्यंत 9 फेऱ्यांचे निकाल हाती आले आहेत. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे  2397 मताने आघाडी आहेत.

पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये प्रत्येक फेरीला बदलते कल, चित्र स्पष्ट होण्यास संध्याकाळ होण्याची शक्यता आतापर्यंतचे कल जाणून घ्या.

दहाव्या फेरीत 1838 मतांनी समाधान आवताडे आघाडीवर 

नवव्या फेरी अखेर भाजप उमेदवार समाधान आवताडे हे 2397 मताने आघाडी आहे.

सहाव्या फेरी 200 मतांनी भालके पुढे

पाचव्या फेरीमध्ये भारतीय जनता पक्ष समाधान महादेव आवताडे 2756

चौथ्या फेरीत 638 मताने भालके पुढे

तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भालके भगीरथ पुढे 

दुसऱ्या फेरीतही भगीरथ भालके 114 मतांनी आघाडीवर

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर  17 एप्रिल रोजी पोट निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात उतरले होते. २ लाख २४ हजार ०६८ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. 

मतमोजणी केंद्रावर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर ही मतमोजणी होत असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे  लॉकडाऊन आहे आणि पंढरपुरात जमावबंदीचा आदेश देण्यात आले आहेत.