School Trip: शाळेची ट्रिप निघाली अन् मोठा अनर्थ टळला! पण... वाचा काय नेमकं घडलं?

Parbhani News: आपल्या समोर कधी कसलं संकट येऊन उभं ठाकेल याची आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु नशीब बलवंतर असेल तर तुम्ही कुठल्या संकटातून वाचू शकता. सध्या असाच काहीसा प्रकार परभणीत (parbhani news) घडला आहे परंतु त्यातही काहींना संकटाचा विपरीत परिणाम भोगावा लागला आहे.

Updated: Dec 11, 2022, 01:34 PM IST
School Trip: शाळेची ट्रिप निघाली अन् मोठा अनर्थ टळला! पण... वाचा काय नेमकं घडलं? title=
School Trip parbhani news

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : आपल्या समोर कधी कसलं संकट येऊन उभं ठाकेल याची आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु नशीब बलवंतर असेल तर तुम्ही कुठल्या संकटातून वाचू शकता. सध्या असाच काहीसा प्रकार परभणीत (parbhani news) घडला आहे परंतु त्यातही काहींना संकटाचा विपरीत परिणाम भोगावा लागला आहे. परभणीच्या गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या चॅप्लिन इंग्लिश स्कूलची ट्रिप घेऊन निघालेल्या स्कूलबसचा आणि एसटीचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी (parbhani school bus accident) येथे हलवण्यात आले आहे. (parbhani news school bus accident students and parents injured)

इतर जखमींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सदरील अपघात गंगाखेड सावरगाव रोडवरील खंडाळी गावाजवळ झाला आहे. गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या चॅप्लिन इंग्लिश स्कूलची स्कूल बस आज चाकूर येथील वाटर पार्क दाखविण्यासाठी 20 मूल आणि पालकांना घेऊन जात होते तेव्हा स्कुलबस गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावाजवळ आली असता अहमदपूर वरून बुलढाण्याकडे जाणाऱ्या बस बरोबर स्कुल बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्कूल बसमधील विद्यार्थी आणि एसटी मधील असे 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात जखमी (students and parents admitted) झालेल्या चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे रेफर करण्यात आले आहे, अशी माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

यापुर्वीही घडले होते असे अनेक प्रकार: 

सध्या स्कूल बसच्या अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. तेव्हा अशावेळी सगळीकडे एकप्रकारे सतर्कता वाढली आहे. परंतु चालकांच्या बेभान मनोवृत्तीचाही कधीकधी बस चालवण्यावर परिणाम होतो आणि त्यानं अनेकदा अपघात घडत असतात. त्यातून अनेकदा रस्ते खराब असल्यानेही अपघात घडतं असतात. मध्यंतरी (shocking news) असाच एक प्रकार घडला होता. नागपूरमध्येही एका स्कूलबसचा (nagpur school bus news) अपघात झाला होता. स्कूल बसच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सूटले आणि बसने आधी दोन ते तीन वाहनांना धडक दिली आणि नंतर एका विजेच्या खांबाला जाऊन बस आपटली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा एका शाळेत शिकत होता. 

मध्यंतरी रायगडमध्ये माणगावजवळ असाच एक प्रकार घडला होता. शाळेच्या सहलीच्या बसला अपघात झाला होता. पुणे येथील ज्ञान प्रबोधनी शाळेतील हे विद्यार्थी होते. ही बस घरोशी वाडी येथील रस्त्याच्या बाजूला 15 ते 20 फूट खाली कोसळली होती. यातही बारा-पंधरा प्रवासी जखमी झाले होते.