''लहान मुलांवर घरच्या घरी उपचार करु नका, तसेच'' -आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री...

कोरोनाच्या तिस-या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका आहे.

Updated: May 23, 2021, 03:02 PM IST
''लहान मुलांवर घरच्या घरी उपचार करु नका, तसेच'' -आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री... title=

मुंबई : कोरोनाच्या तिस-या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावलं उचलण्यासाठी कोरोना टास्कफोर्समधील बालरोगतज्ज्ञांती सभा आयोजीत केली आहे. यामध्ये बालरोगतज्ज्ञं राज्यातल्या डॉक्टरांशी चर्चा करत आहेत. यामध्ये केसेस कश्या हाताळ्याव्यात आणि त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत? याचे मार्ग दर्शन केले जाणार आहे. टास्कफोर्सच्या या मार्गदर्शनाच्या वेळी मुख्यमंत्रीही त्यामध्ये उपस्थीत राहिले आहेत आणि ते डॉक्टरांना सल्ला देणार आहेत.

माझा डॉक्टर या संकल्पनेअंतर्गत बालरोगतज्ज्ञं आणि डॉक्टराची ऑनलाईन सभा घेण्यात येत आहे. यामध्ये टास्कफोर्समधील ३ डॉक्टर्स सगळ्यांशी संवाद साधत आहेत. त्यानंतर तज्ज्ञांकडून यडॉक्टरांच्या प्रश्नांचे निरसन केलं जाईल. बाधितांपैकी ४ ते ५ टक्के बालकांना ऍडमिट करण्याची गरज भासू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे, याची पूर्वतयारी म्हणून बालरोगतज्ज्ञांचे करोना कृतिदल तयार करण्यात आले आहे. यामध्ये दहा बालरोगतज्ज्ञांचा समावेश असणार आहे. तसेच या दलाच्या अध्यक्षपदी पी.डी. हिंदुजा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास प्रभू यांची निवड केली आहे. यामध्ये प्रसिद्ध डॉक्टर डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर यांचाही समावेश असणार आहे.

या सभेच्या सुरवातीला मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवादसाधून लहान मुलांना घरच्या घरी उपचार करु नका आणि लहान मुलांना कोणतेही लक्षणे दिसली तरी त्वरीत उपचार करा असे आवाहन केले आहे