Petrol Rate Today : खुशखबर! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार

Petrol Diesel Price : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली असून आता पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार इंधनावरील कर कमी करण्याचा विचार करत आहे. ज्याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Jun 8, 2023, 08:35 AM IST
Petrol Rate Today : खुशखबर! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार   title=
petrol diesel price on 8 June 2023

Petrol Diesel Price on 8 June 2023 : सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असून, लवकरच पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) स्वस्त होण्याची शक्यता आहे. देशात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. परंतु, भाव मात्र कमी झालेला नाही. काही दिवसांतच केंद्र सरकार ही नाराजी दूर करण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) मोठी कपात होण्याची शक्यता आहे. आज (8 जून 2023) महाराष्ट्रात (maharashtra petrol diesel rate) पेट्रोल 107 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 93.62 रुपयांनी विकले जाणार आहे. दरम्यान इंधन दर कपात झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे ही दर कमी होण्याची शक्यता आहे. 

कच्चा तेलाच्या दरात चढ-उतार 

कच्चा तेलापासूनच रिफाईन करुन पेट्रोल आणि डिझेलची (Petrol Diesel Price) निर्मिती होते. गेल्या वर्षी कच्चा तेलाच्या किंमतीत भडका उडाला होता. याचे दर सुमारे $140 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर ओपेकने आपोआप दरवाढ आणली. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच भावात मोठी घसरण झाली आहे. आज (8 जून 2023) WTI क्रूड $ 0.04 घसरून प्रति बॅरल $ 72.49 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड $ 0.08 कमी होऊन प्रति बॅरल $ 76.87 वर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. 

पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईला ब्रेक 

भारत रशियाकडून स्वस्तात कच्चा तेल खरेदी करत आहे. पण पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत काहीही बदल झालेला नाही. मार्च 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती $140 प्रति बॅरल या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या होत्या. एक लिटर पेट्रोलची विक्रमी किंमत कंपन्यांसाठी 17.4 रुपये आणि डिझेलची 27.7 रुपये होती. तेव्हा जनतेचा रोष होऊ नये म्हणून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्याची वेळ आली. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कंपन्या घेत असल्याचा दावा केला जात आहे. 

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त

महाराष्ट्रात आज पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी कपात झाली आहे. तर डिझेलही कालच्या तुलनेत 35 पैशांनी स्वस्त झाले आहे. पंजाबमध्येही पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल 27 पैशांनी स्वस्त झाले आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज देशातील बहुतांश राज्यांमध्ये राज्य पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.   

किती होईल कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे सरकारी तेल कंपन्यांना होणारा तोटा आता होत नाही. त्यामुळे तेलकंपन्यांकडे किंमती कमी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध झाला आहे. चालू तिमाहीच्या निकालांमध्ये नफा दिसल्यास किंमती पेट्रोल आणि डिझेल्या किंमती कमी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये 2 ते 5 टक्के घट होऊ शकते. महाराष्ट्रात गेल्या जवळपास ११ महिन्यापेक्षा अधिक काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे महागाईचा फटका बसलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.