कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड : थेरगाव क्वीनला पोलिसांनी खाकी इंगा दाखवला तरीही तिच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली नाही. पिंपरी चिंचवड इथे थेरगाव क्वीन या इन्स्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओ मुळे चर्चेत आलेल्या साक्षी श्रीमल हिची थेरं कमी हॊताना दिसत नाहीत.
अश्लील भाषा आणि धमकीच्या व्हिडीओमुळे वाकड पोलिसांनी तिला अटक केली होती. मात्र आता पोलीस ठाण्यातून सुटका झाल्यानंतर तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी अटक कलेला व्हिडीओ टाकत त्याला भाई गिरीच गाणं ही जोडण्यात आलं आहे.
'आपण टिनपाट थोडीच आहे, ढगात आहे ना आपण, खालन कितीपण दगड मारू द्या, आपल्यापर्यंत येत नाहीत भाऊ कोणाची दगडं, अख्या ब्रह्मानडाला शनी बोलून एकटा मी बास होतो, आमच्या बरोबर चालण्याचा बी त्रास होतो, निंद हराम करतो', अस गाणं बॅकग्राउंडला लावण्यात आलं आहे.
पोलिसांनी अटक करून समज देऊन ही तरुणी कडून असा व्हिडिओ टाकला गेल्याने तीला काही पश्चाताप होत नाही का की पोलिसांचा धाक उरला नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्तिथ होत आहे.