पुणे : Pune PMPMLNews : पीएमपीएमएल सेवा ठप्प झाली आहे. पुण्यात बस ठेकेदारांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. 8 ठेकेदारांपैकी 6 ठेकेदारांनी संप पुकारल्यामुळे पुण्यातली पीएमपीएमएल बस सेवा ठप्प आहे. केवळ बीव्हीजी आणि विश्वयोद्धा या कंत्राटदारांच्या बसेस रस्त्यावर आहेत. पूर्वकल्पना न देता अचानकपणे हा संप पुकारण्यात आलाय. संपकरी कंत्राटदारांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा पीएमपीएमएल प्रशासनाने दिलाय. मात्र या संपामुळे नागरिकांचे हाल झालेत.
पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांनी शुक्रवार सकाळपासून बस वाहतूक अचानक थांबवली. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे सहाशे बसची वाहतूक बंद झाली आहे. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे म्हणणं आहे, तर हा दबावतंत्राचा भाग असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले आहे.
मात्र या संपामुळे प्रवाशांचे नुकसान होत आहे. दरम्यान, ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई कारवाई करण्याची नोटीस पीएमपीने सर्व ठेकेदारांना पाठवली आहे.पीएमपीमध्ये सुमारे सात खाजगी ठेकेदारांच्या 956 बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे 650 ते 700 बस दररोज मार्गांवर धावतात. या बसची वाहतूक शुक्रवार सकाळपासून बंद झाली. त्यामुळे पीएमपी प्रशासनाची तारांबळ उडाली.
याबाबत एका खासगी ठेकेदाराकडे विचारणा केली असता गेल्या आठ महिन्यांची 107 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळाली नसल्याबद्दल हा संप केला असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, ठेकेदारांपैकी बीव्हीजी ग्रूपने संपातून अंग काढून घेतले असून त्यांच्या 100 बस मार्गांवर आल्या आहेत.याबाबत सर्व बस स्टॉप वर मोठी गर्दी दिसत आहे.