सुषमा अंधारेंना मोठा धक्का... पोलिसांकडून करण्यात आली 'ही' कारवाई

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक व ठाकरे गटाचे वक्ते शरद कोळी यांनी धरणगाव येथे केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण बंदीचे आदेश काढत अवघ्या काही वेळात जिल्हा बंदीचे देखील आदेश काढले. 

Updated: Nov 4, 2022, 10:45 AM IST
सुषमा अंधारेंना मोठा धक्का... पोलिसांकडून करण्यात आली 'ही' कारवाई title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव: महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Adharey) यांच्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक व ठाकरे गटाचे वक्ते शरद कोळी यांनी धरणगाव येथे केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण बंदीचे आदेश काढत अवघ्या काही वेळात जिल्हा बंदीचे देखील आदेश काढले दरम्यान यावरून जळगाव (Jalgaon) मध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता व सुषमा अंधारे यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनवर पायी मोर्चा काढला होता दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीच ताब्यात घेण्याचे आदेश झुगारून शरद कोळी महापौरांच्या गाडीने अज्ञात रवाना झाले त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करत चोपडाकडे महाप्रबोधन यात्रेसाठी जाणाऱ्या (Maharashtra Politics) सुषमा अंधारे यांची गाडी दोन ते तीन ठिकाणी तपासण्यात आल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. (politician sushama andhare faces trouble near chopde mahaprabhodhan police checks her car)

अण्णा हजारे यांचे लोकपाल आंदोलन एक षडयंत्र, चोपडा येथील महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांची अण्णा हजारेंवर (Anna Hazare) टीका :

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

अण्णा हजारे यांचे लोकपाल आंदोलन हे षडयंत्र असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या (Thackeray Gat) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चोपडा येथील महाप्रबोधन यात्रेत भाषणादरम्यान केला आहे मात्र लोकपाल आंदोलन ज्या पद्धतीने अण्णा हजारे यांनी उभं केलं हे आंदोलन फक्त इथलं सरकार उलथून लावून लोकांमध्ये संभ्रमित अवस्था निर्माण करत लाट तयार करण्यासाठी होत. मात्र लोकपाल आंदोलनातल्या त्रुटी कधीही दाखवण्यात आल्या नाहीत त्यामुळे हे षडयंत्र असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रिया नंतरही सुषमा अंधारे आपल्या प्रतिक्रियेवर ठाम :

गोवाहाटी जाताना पहिल्यांदाच मिलिंद गटाची बाजू मांडणारे सर्वात पहिले आमदार संजय शिरसाठ होते मात्र संभाजीनगर (Sambhaji Nagar) मध्ये आता ज्या पद्धतीने अतुल सावे संदिपान भुमरे व अब्दुल सत्तार यांना फुल फ्लेक्स अधिकार दिल्या जात आहे यावरून संजय शिरसाठ यांची कुतुंबना होत असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले असून संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे आपल्या संपर्कात असलेल्या दाव्याबाबतचे गांभीर्य दीपक केसरकरांना कळत नसून संजय शिरसाठ यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यामुळे शिरसाट कधीही परत फिरू शकतात असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला आहे.