थंडीत हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं? दीर्घायुष्यी होण्यासाठी हिवाळ्यात नेमकं काय कराल?

थंडी अनेकांना आवडते. पण हा ऋतू हृदयविकाराची समस्या असलेल्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. या थंडीत शरीरात अनेक बदल होत असतात. अशावेळी हिवाळ्यात नेमकी काय काळजी घेणे आवश्यक आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 12, 2024, 04:20 PM IST
थंडीत हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं? दीर्घायुष्यी होण्यासाठी हिवाळ्यात नेमकं काय कराल? title=

थंडीत हार्ट अटॅकचा धोका वाढत आहे. थंडीमुळे हृदयाच्या शिरा आकुंचन पावणे, रक्त प्रवाह वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे 30 ते 50 वयोगटातील हृदयरोग रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच तरुणांमध्ये ही हृदयाचा झटका येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.  ब्लड प्रेशर, ताणतणाव, व्यसन, धूम्रपान , अति व्यायाम, शरीराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे  हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ होते आहे. त्यामुळे अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं नागरिकांना हृदयरोग तज्ञांनी आवाहन केल आहे. 

घाम न येणं हे एक कारण 

एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्रोफेसर नवल विक्रम यांच्या मते, हिवाळ्यात शरीराला कमी घाम येतो. त्यामुळे रक्तदाब वाढू लागतो आणि त्याचा थेट परिणाम हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांवर होतो. याशिवाय शरीराला उबदार ठेवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे हृदयावर दबाव वाढतो.

कोलेस्ट्रॉलचा होतो परिणाम 

राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार सांगतात की, थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा लागते. या काळात हृदयाच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे शिरा आकसतात. ही स्थिती हृदयरोग्यांसाठी घातक ठरू शकते.

ब्रेन स्ट्रोकचाही धोका

AIIMS चे प्रोफेसर नवल विक्रम म्हणतात की, हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका 30% वाढतो. शरीरातून घाम येत नसल्यामुळे रक्तदाब वाढतो, जे ब्रेन स्ट्रोकचे मुख्य कारण बनते. अयोग्य रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूच्या पेशी मरायला लागतात. अनेक वेळा ही स्थिती इतकी गंभीर बनते की रुग्णाला वेळीच लक्षातही येत नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा

* मीठाचे सेवन कमी करा आणि लोणी आणि तुपाचा वापर मर्यादित करा.
* कोमट पाणी पिणे आणि शरीर हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे.
* घरामध्ये नियमित व्यायाम करा जेणेकरून शरीराला घाम येतो आणि रक्ताभिसरण व्यवस्थित राहते.
* हृदय आणि मेंदूशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. थंडीत उबदार कपडे घाला आणि तापमानात अचानक होणारे बदल टाळा.

थंडीत का वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन
30 वयोगटातील हृदयरोग रुग्णांच्या संख्येत वाढ
तरुणांमध्ये हृदयाचा झटका येण्याच्या प्रमाणात वाढ