मोशी कचरा डेपोला आगीनंतर आता राजकीय वणवा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर आता राजकीय वणवा भडकायला लागला आहे.

Jaywant Patil Updated: Apr 2, 2018, 12:32 AM IST
मोशी कचरा डेपोला आगीनंतर आता राजकीय वणवा title=

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर आता राजकीय वणवा भडकायला लागला आहे. या आगीच्या निमित्तानं भाजप आमदार महेश लांडगे आणि शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप प्रत्त्यारोप सुरु झालेत. मोशी कचरा डेपोला लागलेली आग तब्बल 24 तासांनंतर आटोक्यात आली. मात्र ही आग म्हणजे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचं अपयश असल्याची टीका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

ऊर्जा निर्मितीचा प्रस्ताव मंजूर

त्यावर आरोप करणाऱ्यांनी आतापर्यंत काय काम केलं, ते सांगावं असा पलटवार, भाजप आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. मुळात महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पालिकेनं कचऱ्यावर प्रक्रिया करत ऊर्जा निर्मितीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पण त्या पूर्वीच आग लागल्याने प्रकल्प आणि पर्यायाने लांडगे यांच्यावर वार करण्याची संधी आढळराव पाटलांना मिळाली.