व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोल्हापूर मनपाला नोटीस

आरोग्य अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

Updated: Sep 14, 2020, 08:01 PM IST
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोल्हापूर मनपाला नोटीस title=

कोल्हापूर : वैद्यकीय कचरा चुकीच्या पद्धतीने हाताळल्या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोल्हापूर महानगरपालिका वैद्यकीय कचरा वर्गीकरण न करता तो थेट चुकीच्या पद्धतीने पाठवीत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही नोटीस बजावली आहे.

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. शहरातील दवाखान्यातील वैद्यकीय कचरा एका गाडीतून ट्रकमध्ये भरला जात होता. हे ट्रक कोठे कोणाचे आहेत आणि ते कुठे जात होते? याबाबत अजून काहीही माहिती पुढे आलेली नाही.

वैद्यकीय साहित्य वापरल्यानंतर तो कंटेनर पूर्ण सीलबंद करुन न्यावा लागतो. पण व्हिडिओमध्ये सर्वकाही अस्ताव्यस्त स्थितीत पडलेले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला होता.