'महाराष्ट्र सरकारने ५६ टक्के लसी वापरल्याच नाहीत'....केंद्र वि राज्य वाद पुन्हा सुरू

केंद्राकडून मिळालेल्या कोरोना लसीपैकी ५६ टक्के लसी महाराष्ट्र सरकारने वापरल्याचं नसल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

Updated: Mar 17, 2021, 02:56 PM IST
'महाराष्ट्र सरकारने ५६ टक्के लसी वापरल्याच नाहीत'....केंद्र वि राज्य वाद पुन्हा सुरू title=

मुंबई : केंद्राकडून मिळालेल्या कोरोना लसीपैकी ५६ टक्के लसी महाराष्ट्र सरकारने वापरल्याचं नसल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याला लस वितरित करण्यात येत आहेत. त्यात महाराष्ट्राला ५४ लाख लसींचा पुरवठा झाला आहे. मात्र त्यातील १२ मार्चपर्यंत केवळ २३ लाख लसीच लोकांना देण्यात आल्या आहेत, असा दावाही जावडेकर यांनी केला आहे.

त्यामुळे पहिले कोरोना महामारीची स्थिती आणि आता लसीकरण मोहीमेतही ठाकरे सरकार कुठेतरी कमी पडतंय, असंही जावडेकरांचं म्हणणं आहे.

 

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, शिवसेनेचे खासदार सांगतात की महाराष्ट्राला लसी द्या.

राज्यसभेमध्ये शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी मागणी केली होती की, महाराष्ट्राला अधिक प्रमाणआत लसी देण्यात याव्यात. त्याशिवाय महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केंद्राकडे विनंती केलेली की महाराष्ट्राला लसींचा जास्त पुरवठा व्हावा.

यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. केंद्र लसी पुरवतं, मात्र महाराष्ट्र सरकार त्या वापरतच नाही, असा सूर त्यांच्या ट्विटमधून दिसून येत आहे.