माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी डॉ. हेडगेवारांबद्दल म्हणाले....

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिप्रायवहीत डॉ. हेडगेवारांबद्दल टिपणी केली आहे.

Updated: Jun 7, 2018, 06:56 PM IST

नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिप्रायवहीत डॉ. हेडगेवारांबद्दल टिपणी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाचे अध्यक्ष केशव बळीराम हेडगेवार हे भारताचे महान सुपूत्र आहेत, असे गौरवोद्गार भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. स्मारकाच्या अभिप्रायवहीत देखील प्रणव मुखर्जी यांनी टिपण्णी केली आहे. प्रणव मुखर्जी यानंतर भाषण करणार आहेत. ते भाषणात काय बोलणार याविषयी उत्सुकता लागून आहे. प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसच्या तृतीय वर्ष कार्यक्रमाच्या समारोपाला हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रणव मुखर्जी यांच्या या उपस्थितीवर त्यांच्या कन्येने देखील नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला संर संघचालक मोहन भागवत हजर आहेत, यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचलन केलं.