पुणे बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील एक संशयित ताब्यात; 'त्या' सीसीटीव्हीमुळं लागला छडा

Pune Bopdev Ghat Gang Rape: पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. 

Updated: Oct 11, 2024, 01:23 PM IST
पुणे बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील एक संशयित ताब्यात; 'त्या' सीसीटीव्हीमुळं लागला छडा

Pune Bopdev Ghat Gang Rape: पुण्यातील बोपदेव घाटात एका 21 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर तिन्ही आरोपी फरार होते. अखेर या प्रकरणातील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येतेय. पुणे पोलिसांनी मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नाहीये. 

Add Zee News as a Preferred Source

पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना 4 ऑक्टोबर रोजी घडली होती. या घटनेला कित्येक दिवस उलटले तरी मोकाट होते. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तैनात केली होती. तसंच, आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली होती. पुणे पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. 

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका तरुणाला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. येवले वाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित तरुण सीसीटीव्हीत कैद झाले होते. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी मात्र याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाहीये. तसंच, दुपारपर्यंत या संपूर्ण घटनेच्या संदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. 

काय आहे प्रकरण?

21 वर्षीय तरुणी तिच्या मित्रांसोबत बोपदेव घाटात फिरण्यासाठी आली होती. त्यावेळी तिथे आलेल्या तीन जणांनी तिच्याच मित्रासमोर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कोयता, बांबू , धारदार शस्त्र हातात घेऊन आरोपींनी दोघांना धमकावून तरुणीवर  अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दोन संशयित रेखाचित्रदेखील जारी केली असून सीसीटीव्हीसुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहेत. 

About the Author