Pune Bandh Updates : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. पुण्यात मूक मोर्चाही काढण्यात आला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार बंद आहे. (Pune Bandh)
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंधन पंप आज सुरु आहेत. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. अहवालानुसार, किराणा, बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यासारख्या अत्यावश्यकसकाळी 10 वाजेपर्यंत सेवा सुरु होत्या. आता दुपारी 3 वाजेपर्यंत या सेवा बंद राहणार आहेत. बंद दरम्यान वैद्यकीय दुकाने सुरु आहेत. तर पुणे बंदला पाठिंबा देण्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत. ( हेही वाचा - Pune Bandh Today: पुण्यात बंदला मोठा प्रतिसाद, पाहा LIVE अपटेड )
पुण्यातील बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. यात
- लक्ष्मी रस्ता : सोन्या मारुती चौक ते टिळक चौक
- शिवाजी रस्ता : स गो बर्वे चौक ते बेलबाग चौक
- बाजीराव रस्ता : पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक
- गणेश रस्ता : फडके हौद चौक ते जिजामाता चौक
- केळकर रस्ता : आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या रस्त्यांचा समावेश आहे.
पुण्यातील मार्केट यार्डमधील सर्व दुकाने आज बंद आहेत. कांदे बटाटा विभाग, फुल बाजार विभाग, पान मार्केट यांच्यासह सर्व व्यापारांनी कडकडीत बंद पाळला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज शिवप्रेमी संघटनांनी पुणे बंदची हाक दिली आहे. यालाच कृषी उत्पन्न बाजार समितीने पूर्णपणे पाठिंबा दिला आहे.