बिबट्याला वाचविले पण कुत्र्याला पाण्यातच ठेवून वनविभाग कर्मचारी निघाले

बिबट्याला वाचविले पण कुत्र्याला पाण्यातच ठेवून वनविभाग कर्मचारी निघाले

Updated: Jul 18, 2019, 02:44 PM IST
बिबट्याला वाचविले पण कुत्र्याला पाण्यातच ठेवून वनविभाग कर्मचारी निघाले title=

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथील एका विहिरीत बिबट्या आणि कुत्रा पडल्याची घटना घडली. शिकारीच्या शोधात असणारा बिबट्या कुत्र्यासहीत विहिरीत पडल्याचे स्थानिक सांगत आहेत. सहादेव सोनवणे या शेतकऱ्याच्या घराच्या बाजुला असणाऱ्या विहिरीत पहाटे हे दोन प्राणी पडले. या घटनेत कुत्र्याचा पाण्यात मृत्यु झाला तर बिबट्या विहिरीच्या कपारीला बसुन होता. आज सकाळी 11:30च्या सुमारास विभागाने पिंजरा लावुन बिबट्याला बाहेर काढले. मात्र विहिरीत पडलेल्या कुत्र्याला पाण्यातच ठेवुन वनविभागाचे कर्मचारी निघुन गेले. 

माणसाच्या संरक्षणासाठी कुत्रा दिवस रात्र पहारा देत असतो. आपल्या मालकावर कुठलही संकट येऊ नये यासाठी पुढे येणारा, संकटाचा सामना करण्यासाठी कुत्रा हा प्राणी ओळखला जातो. केवळ भूतदया म्हणूनही या कुत्र्याला विहीरीबाहेर न काढलेल्या वनविभाग कर्मचाऱ्यांविरुद्ध संतापाचे वातावरण आहे. 

 

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र मृत्युशी झुंज देत पाण्यातच कुत्र्याने प्राण सोडला. त्या कुत्र्याला वाचविण्यासाठी कुणीही प्रयत्न न केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या घटनेमुळे हिच का माणुसकी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.