Junnar ST Bus Accident : एसटी मागची दोन्ही चाके निखळली; एक चाक गाडीच्या पुढे गेले आणि...

ST Bus Accident : पुणे नाशिक रस्त्यावर एक विचित्र अपघात झालाय. महामार्गावर वेगात जाणाऱ्या बसची चाकं ऐन प्रवासातच निखळली. काहीही समजायच्या आत या बसची दोन चाकं निखळली. हे लक्षात आल्यावर चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवलं आणि बस रस्त्यातच थांबवली.

Updated: May 16, 2023, 10:35 AM IST
Junnar ST Bus Accident : एसटी मागची दोन्ही चाके निखळली; एक चाक गाडीच्या पुढे गेले आणि... title=

Junnar ST Bus Accident : पुणे - नाशिक रस्त्यावर एक विचित्र अपघात झाला आहे. पुणे -नाशिक महामार्गावर धावणाऱ्या लालपरीला हा अपघात झाला आहे. या अपघाचे कारण ही एसटीचा भोंगळ कारभार असल्याचे पुढे आले आहे. एसटीची मागची दोन्ही चाके निखळली. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले. बस तिरकी होऊन रस्त्यावरच खरडत-खरडत जात होती. 

हा अपघात जुन्नर जवळील आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ घडला. महामार्गावर वेगात जाणाऱ्या बसची चाकं ऐन प्रवासातच निखळली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवाशी नशीब बलवत्तर म्हणून थोड्यक्यात बचावले आहेत.  पुणे -नाशिक महामार्गावर एसटीची दोन्ही चाके निखळली.  यादरम्यान बसचा खालचा भाग घासत गेल्याने मोठ्या ठिणग्या उडाल्या. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडीतला हा थरार अनेक प्रवाशांनी आज अनुभवला.

परळ डेपोची बस क्रमांक MH20-BL 3618 ही गाडी मुंबईतील परळवरुन पुण्यातील नारायणगावकडे निघाली होती. एसटीत जवळपास 35 प्रवासी होते. राज्य परिवहन महमंडळाची एस टी बस नादुरुस्त झाल्यामुळे बस प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 

अशीच एक घटना कोकणातील रायगड जिल्ह्यात घडली होती. मिरज - श्रीवर्धन या एसटीची म्हसळे दिघी मार्गावरती मागील दोन चाके निखळल्यामुळे अपघात होता होता वाचला होता.  श्रीवर्धन आगारातून सुटणारी श्रीवर्धन - पुणे या बसची देखील मागची दोन चाके वडघर पांगलोली गावाजवळ निघाल्याने मोठी खळबळ उडाली होती. शाळा आणि महाविद्यालयांच्या बहुतांश सहली एसटी बसने नेत असताना हा अपघात घडला होता. एसटीची अशी दयनिय अवस्था असेल तर एसटी आगाराच्या गाड्यांबाबत अविश्वास व्यक्त केला जात आहे.

एसटी महामंडळाच्या अनेक गाड्यांची अवस्था दयनिय आहे. अनेक वेळा गाड्यांचे ब्रेक लागत नाहीत. अनेक वेळा गाड्या रस्त्यात ब्रेक डाऊन होतात. या सर्व प्रकारांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. अनेक वेळा एसटीच्या सिट खराब असतात. तसेच गाड्याच्या खिडक्याही तुटक्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. असे असताना त्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.