close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राष्ट्रवादीला पुण्यात पुन्हा झटका, आणखी एक नेता भाजपमध्ये

राष्ट्रवादीला गळती सुरुच...

Updated: Sep 15, 2019, 08:45 PM IST
राष्ट्रवादीला पुण्यात पुन्हा झटका, आणखी एक नेता भाजपमध्ये

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील दौंडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि आमदार राहुल कुल, बाबुराव पाचर्णे, भिमराव तापकिर यांच्या प्रमुख उपस्थितीत काकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काकडे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते पक्ष सोडून शिवसेना आणि भाजपमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीला गळती अजूनही सुरुच आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला लागलेली ही गळती पक्षापुढे मोठं आव्हान असणार आहे.

दुसरीकडे भाजपच्या नेत्यांमध्ये धमक नसल्यामुळेच ते शरद पवारांनी घडवलेले नेते आयात करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी केली आहे. भाजपकडे नेते नाहीत. त्यामुळे आमच्याकडून गेलेले नेते त्यांच्या डब्यात पाणी भरत आहेत. याचा अर्थ कार्यकर्ते आणि नेते घडविण्यात भाजप कमी पडतंय असा टोला ही रोहित पवार यांनी लगावला आहे. तर बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी झालेली घोषणाबाजी ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केलीय.