नवले पूल येथे अपघात, अखेर फरार चालकाला अटक

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पूल येथे अपघातात (Navale Bridge Accident) फरार झालेला चालकाला सिंहगड पोलिसांनी अटक  केली आहे.  

Updated: Nov 22, 2022, 09:10 AM IST
नवले पूल येथे अपघात, अखेर  फरार चालकाला अटक  title=

Navale Bridge Accident in Pune : पुण्यातील नवले पूल येथे अपघातात (Navale Bridge Accident) फरार झालेला चालकाला सिंहगड पोलिसांनी अटक  केली आहे. सोमवारी एका कंटेनरने तब्बल 48 गाड्यांना ठोकर दिली होती. यात सुमारे 40 ते 50 जण जखमी झालेत. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला होता. या चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मनीराम यादव असे या  टेनर चालकाचे नाव आहे. पुण्यातील चाकण नाणेकरवाडी येथून पोलिसांनी त्याला अटक आहे.

एकामागोमाग अनेक गाड्यांना ठोकर 

Pune Navale Bridge Accident रविवारी रात्री पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात (Pune Navale Bridge Accident) झाला होता. एक दोन नव्हे तर तब्बल 48 वाहने एकमेकांवर थडकली होती. यामध्ये सुमारे 40 ते 50 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. साताऱ्याहून मुंबईच्या (Satara To Mumbai) दिशेने जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर चालकाचे गाडीवरील ताबा सुटला आणि एकामागोमाग अनेक गाड्यांना ठोकर दिली. तब्बल 48 वाहनांना धडकले. या विचित्र अपघातानंतर चालकाने धूम ठोकली होती. मात्र, या अपघातातबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

कंटेनरचे इंजिन बंद करुन गाडी न्यूट्रलवर

नवले पुलावर झालेल्या अपघातामध्ये कंटेनर चालकाचा बेजाबदारपणा पुढे आला आहे. कंटेनरचे इंजिन बंद करुन गाडी न्यूट्रलकरुन चालवल्यामुळे पुण्याच्या नवले पुलावर अपघात घडल्याचे तपासात समोर आले आहे. कंटेनरचा ड्रायव्हर फरार होता. सिंहगड पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेल त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

आधी कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने सांगितले...

आधी कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात होतं. पण तपासात कंटेनरचे ब्रेक फेल नसल्याचे समोर आले आहे. यात ड्रायव्हरची सर्वात मोठी चूक असल्याची माहिती आता तपासात समोर आली आहे. नवले ब्रिजजवळच्या उतारावर ड्रायव्हरने इंजिन बंद केले आणि गाडी न्यूट्रलवर पुढे रेटली. त्यातच नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे माहिती तपासात समोर आली आहे. पुण्यातील नवले पूल अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. नवले पुलावर सातत्याने वाहनांचे अपघात होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.