व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या 'जाळ्यात', तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त

Pune news: माशांची उलटी ही सर्वात जास्त महाग (whale fish vomet) असते म्हणून त्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, सध्या असे प्रकार अनेक ठिकाणी वाढू लागले आहेत सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. 

Updated: Nov 30, 2022, 05:21 PM IST
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या 'जाळ्यात', तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त title=
फाईल फोटो

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: माशांची उलटी ही सर्वात जास्त महाग (whale fish vomet) असते म्हणून त्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, सध्या असे प्रकार अनेक ठिकाणी वाढू लागले आहेत सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. व्हेल माशाच्या उलटीला (whale vomit smggling) भारतात व्यापार करण्यासाठी बंदी असताना पुण्यातील डेक्कन (deccan) पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जण तब्बल 5 कोटी पेक्षा जास्त रकमेच व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. डेक्कन पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डेक्कन पोलीस ठाणे हद्दीत व्हेल माशाची करोडो रुपये किंमतीच्या उलटीची तस्करी (pune crime news) होणार आहे. (pune news today police arrested men for smuggling whale fish vomit)

काय घडला नेमका प्रकार 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन एक पथक तयार केला आणि मिळालेल्या खबरीनुसार फग्युर्सन कॉलेज (fergusson college) बसस्टॉपच्या मागील बाजुस तीन इसम संशयास्पद स्थितीत उभे असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यात असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेमध्ये व्हेल माशाची उलटीचे दोन मोठे तुकडे मिळुन आले. यांच्याकडे व्हेल माशाची उलटी  ही कशाकरिता आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्ही  व्हेल माशाची उलटी ही विक्री करण्याकरिता आणली असल्याचे सांगुन त्याने रस्त्याच्या कडेला त्यांना  उलटी विक्री करण्याकरिता मदत करणारे दोन जण थांबलेले आहेत असे सांगितलेने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 

हेही वाचा - काहीही! पालिकेच्या आशीर्वादाने सापांची चंगळ, मारणार महागड्या उंदरांवर ताव

पाहा किती माल केला जप्त

आरोपी राजेंद्र राकेश कोरडे यांच्या ताब्यात असेलेल्या काळया रंगाच्या बॅगेमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा त्याचे वजन 2 किलो 994 ग्रॅम इतके कि 2,99,40,000/- इतकी आहे तर दुसरा आरोपी नवाज अब्दुला कुरुपकर याच्या ताब्यात असेलेल्या मेहंदी रंगाच्या बॅगेमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा त्याचे वजन 2 किलो 286 ग्रॅम इतके आणि त्याची किंमत 2,28,60,000 एवढी आहे तसेच तिसरा आरोपी विजय विठ्ठल ठाणगे याच्या कडील ताब्यात असलेली एक काळया रंगाची हिरोहोंडा स्पेल्डर एन एक्स जी स्मार्ट दुचाकी क्रमांक एम.एच 12 एम. के- 9193 अशा वर्णनाची किंमत 35,000 असा एकुण 5 किलो व्हेल माशाचा उल्टीचे तुकडे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.त्याच्या कडून 5,28,35,000 एवढं किंमतीच साहित्य जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - Video: जंगली हत्तींचा हैदोस; जीवाची पर्वा न करता अनेकजण फोटो काढण्यासाठी रस्त्यावर

राजेंद्र राकेश कोरडे, वय 28, रा- मु.पो- अजंले ता- दापोली, जि-रत्नागिरी, 2, नवाज अब्दुला कुरुपकर, वय 24, रा. मु.पो - अडखळ, अंजर्ले, जुईकर मोहल्ला ता- दापोली, जि- रत्नागिरी 3. अजिम महमुद काजी, वय 50 वर्षे, रा.मु.पो - अडखळ, अंजर्ले, जुईकर मोहल्ला ता- दापोली, जि- रत्नागिरी यांनी घेऊन येऊन इसम नामे 4. विजय विठ्ठल ठाणगे, वय-56, धंदा- व्यवसाय, रा- चैतन्यनगर, रामचंद्र अपार्टमेंट, फ्लॅट नं 203, धनकवडी, पुणे 5. अक्षय विजय ठाणगे, वय- 26 रा अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.