Pune School | फीवरुन शाळेतल्या बाऊन्सर्सची पुन्हा पालकांना धक्काबुक्की

Pune : पुण्यात पुन्हा एकदा पालकांसोबत गैरवर्तनाचा प्रकार समोर आला आहे.

Updated: Apr 4, 2022, 07:13 PM IST
Pune School | फीवरुन शाळेतल्या बाऊन्सर्सची पुन्हा पालकांना धक्काबुक्की title=

पुणे : पुण्यातील उंड्री येथील युरो शाळेत बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेल द्वारे टीसी पाठवले. यानंतर शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याआधी बिबवेवाडी इथल्या क्लाईन मेमोरियल स्कूलमध्ये देखील पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली होती.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शाळांमध्ये बाऊंसर ठेवले जात आहेत. अनेक शाळांमध्ये बाऊंसर ठेवल्याने शाळेकडून पालकांमध्ये दहशत निर्माण केलं जात असल्याचा पालकांचा आरोप आहे. 

बिबवेवाडी येथील शाळेतील बाऊन्सर कडून पालकांना झालेल्या धक्काबुक्कीचा मुद्दा विधानसभेतही चर्चिला गेला होता. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

शाळेच्या बाऊन्सर्सकडून होत असलेल्या धक्काबुकीबाबत पालकांनी संताप व्यक्त केला. पुण्यातील खासगी शाळांमध्ये बाऊन्सरकडून पालकांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शैक्षणिक संस्थांना खासगी बाऊन्सर का हवेत? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.