मदरशात शिकणारी सहा मुलं गायब

मदरशात शिकणारी सहा मुलं गायब झाली आहेत.

Updated: Jul 6, 2018, 10:36 PM IST

पुणे : पुण्यातील मदरशात शिकणारी सहा मुलं गायब झाली आहेत. हडपसर येथील सय्यदनगरमधून ही सहा अल्पवयीन मुलं गायब झाली आहेत. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही सगळी मुलं मुळची बिहारमधील आहेत.  ३ जुलै राजा मैदानावर खेळत असताना अचानक ही मुलं बेपत्ता झाली.

शोध सुरू 

सय्यदनगर इथल्या गल्ली नंबर 21 मधील दारुल उलुम चिस्तिया जलालिया या मदरशात ही मुलं संध्याकाळी खेळण्यासाठी गेली होती. मदरशाबाहेर असलेल्या टॉयलेटमध्ये जातो असे सांगून ही मुलं गेली. मात्र ती परत आलीच नाहीत. पोलीस या मुलांचा शोध घेत आहेत.