पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार

 Pune University Exams Online :गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, हा संभ्रम दूर आता दूर झाला आहे. 

Updated: Feb 2, 2022, 08:36 AM IST
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार title=

पुणे : Pune University Exams Online : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, हा संभ्रम दूर आता दूर झाला आहे. 

सोमवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे महाविद्यालये बंद करावी लागल्यानंतर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्या परिषदेत घेण्यात आला होता.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी नियुक्‍त केलेल्या समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन आणि अन्य वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची शिफारस  केली होती. गेल्या काही दिवसांत पुन्हा ऑफलाइन परीक्षांची चर्चा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परीक्षांबाबत चर्चा झाली. त्यानंतर विद्या परिषदेने ऑनलाइन परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या पुणे विद्यापीठाच्या परीक्षा या आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.