भाजप - काँग्रेसचे नगरसवेक एकमेकांना भिडलेत, महापालिकेत जोरदार राडा

Rada in Sangli Municipal Corporation : महानगरपालिकेच्या महासभेत तुफान गदारोळ पाहायला मिळाला.  

Updated: Apr 18, 2022, 03:32 PM IST
भाजप - काँग्रेसचे नगरसवेक एकमेकांना भिडलेत, महापालिकेत जोरदार राडा title=

सांगली : Rada in Sangli Municipal Corporation : महानगरपालिकेच्या महासभेत तुफान गदारोळ पाहायला मिळाला. पॉईंट ऑफ ऑर्डरवरून काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक आक्रमक झालेत. त्यांच्यात वाद झाला आणि जोरदार राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या महापौरांना यावेळी धक्काबुक्की करण्यात आली. मागील सर्वसाधारण महासभेच्या विषयातील इतिवृत्त वाचून कायम करण्यावरून गदारोळझाला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी इतिवृत्त वाचून गोंधळातच विषय मंजूर केला. यामुळे संतप्त नगरसेवकांनी राजदंड पळवला. भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापौरांना धक्काबुक्की केली. यावेळी महापौराचा धिक्कार असो आशा घोषणां भाजपच्या नगरसेवकांनी दिल्यात.

सांगली महानगरपालिकेच्या महासभेत तुफान गदारोळ झाला. पॉईंट ऑफ ऑर्डरवरून काँग्रेस आणि  भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी याना घेराव घालून धक्काबुक्की करण्यात आली संतप्त नगरसेवकांनी राजदंड पळवला. मागील सर्वसाधारण महासभेच्या विषयातील इतिवृत्त वाचून कायम करण्यावरून गदारोळ झाला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी इतिवृत्त वाचून गोंधळातच विषय केला मंजूर केला. संतप्त नगरसेवकांनी राजदंड पळवला तर भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापौरांना धक्काबुक्की केली. पळपुट्या महापौराचा धिक्कार असो आशा घोषणांनी सभागृह दणाणले.

महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच सरकार आहे. राज्यात जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली, तरी सांगली महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी निर्माण झाली आहे. सांगली महानगरपालिकेच्या महासभेत काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवकाकडून गदारोळ करण्यात आला. राष्ट्रवादीचे महापौर दिग्विजय सर्यवंशी यांना धक्काबुक्की करून संतप्त झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजदंड पळवला. 
           
राष्ट्रवादीचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर असतानासुद्धा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता संतप्त काँग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि सत्ताधारी राष्ट्रवादीलाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि भाजप या पक्षातील सर्व नगरसेवक एकत्रित येऊन राष्ट्रवादीच्या कारभाराविरोधात आक्रमक झाले आहेत. 

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये तीन वर्षांपूर्वी भाजपची एक हाती सत्ता आली होती, मात्र पहिली अडीच वर्षे झाल्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने भाजपचे काही नगरसेवक फोडून सत्तांतर घडवत राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची सत्ता आणली. मात्र काही महिन्यातच आता राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा महापालिकेत सामना रंगला आहे. कोट्यवधीच्या एलईडी लाईट च्या ठेक्यावर वरून काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक संतप्त झाले आहेत. ठेका आणि यातल्या कामांच्या बाबत आक्षेप घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे महासभेत सुद्धा राष्ट्रवादी एकतर्फी कारभार करत असल्याचा आरोप केला जात आहे.