भाजपला मोठा धक्का, 10 नगरसेवकांना जिल्हाधिकारीनी केलं अपात्र

 ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे.  

Updated: Oct 30, 2021, 06:58 AM IST
भाजपला मोठा धक्का, 10 नगरसेवकांना जिल्हाधिकारीनी केलं अपात्र title=

रायगड : 10 Shiv Sena corporators ineligible : ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शिवसेनेला शह देण्यासाठी काही नगरसेवकांना आपल्या गळाला लावले होते. शिवसेनेच्या 10 नगरसवेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्यावर अपात्रेची वेळ आली. त्यामुळे भाजपला नगरसवेक फोडूनही नगरपालिकेत वर्चस्व गाजवता येणार नाही, हे स्पष्ट झालेय. (10 Shiv Sena corporators who joined BJP in Matheran Municipal Council are ineligible)

माथेरान नगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसला. शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 10 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी हा निर्णय दिला आहे. 

दरम्यान, अंतर्गत वादाला कंटाळून या 10 नगरसेवकांनी 27 मे रोजी कोल्हापूर इथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या 10 नगरसेवकांच्या राजकीय प्रवेशाला शिवसेनेने हरकत घेतली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या 10 नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी भाजपलाही जोरदार दणका मिळाला आहे.