पाईपलाईन फुटली आणि असा काही फवारा हवेत उडाला की...

रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण (Uran)येथे पाण्याची पाईपलाईन ( water pipeline) फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.  

Updated: Dec 17, 2020, 07:42 PM IST
पाईपलाईन फुटली आणि असा काही फवारा हवेत उडाला की...  title=

नवी मुंबई : रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण (Uran)येथे पाण्याची पाईपलाईन ( water pipeline) फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. उरण तालुक्यात पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले शिवाय रस्त्यावर पाण्याचा उंचच उंच फवारा उडत होता. दिघोडे गावाजवळची घटना आहे.

पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने याचा पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. उरणच्या नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिरट पाणी वाया गेले आहे.