Railway Recruitment : सरकारी नोकरीची संधी, दहावी पास उमेदवारांना परीक्षेशिवाय रेल्वेत नोकरी

 रेल्वेमध्ये भरती (Railway Recruitment 2021) करण्यात येणार आहे. रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. 

Updated: Feb 28, 2021, 06:27 PM IST
Railway Recruitment : सरकारी नोकरीची संधी, दहावी पास उमेदवारांना परीक्षेशिवाय रेल्वेत नोकरी

मुंबई : रेल्वेमध्ये भरती (Railway Recruitment 2021) करण्यात येणार आहे. रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. ही नोकरी परीक्षा न देता मिळू शकणार आहे. त्यामुळे त्वरीत नोकरीचा अर्ज करा आणि रेल्वेतील नोकरीची संधी सोडू नका. (Railway Job Notification 2021) मध्य रेल्वेत  (Central Railway) ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ट्रेड अॅप्रेंटिससाठी 2532 पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्या आले आहेत.

रेल्वेने जॉब नोटिफिकेशन  (Railway Job Notification 2021) जारी केले आहे. त्यामुळे आता इच्छुकांना अर्ज करण्याची चांगली संधी आहे. मध्य रेल्वेने 2532 ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी रिक्त पदांसाठी ही भरती करत आहे. या रिक्त पदांसाठी नेमणुका रेल्वे भरती सेल (RRC) अंतर्गत विविध ट्रेडमध्ये केल्या जाणार आहेत.

रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 6 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार www.rrccr.com अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. ही भरती मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलपूरसह या भागांत करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 06 फेब्रुवारी, 2021
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 05 मार्च 2021

शैक्षणिक पात्रता

रेल्वेमध्ये ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्डाकडून दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, पदासंबंधी आयटीआय प्रमाणपत्र असण्याची गरज आहे.

वयाची अट

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित केले गेले आहे. 01.01.2021 रोजी वयाची नोंदणी केली जाईल.

अर्जासाठी शुल्क

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये भरावे लागतील. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 मार्च 2021 आहे.

निवड प्रक्रिया

रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत देण्याची गरज नाही, परंतु दहावीच्या आधारे गुणवत्ता निश्चित केली जाईल. या गुणवत्ता यादीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी आपण www.rrccr.com येथे क्लिक करुन पाहू शकता.