close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग

Updated: Jul 21, 2019, 11:17 PM IST
धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस

धुळे : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. गेल्या २४ तासात साक्री आणि नवापूर तालुक्यात ७० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या १८ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीपाच्या पेरण्या रखडल्या होत्या, त्याचसोबत पाणी टंचाईची भीषण समस्या ग्रामस्थांसमोर उभी ठाकली होती. अखेर जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. 

विशेष म्हणजे गेल्या चोवीस तासात पावसाचा जोर इतका होता की नवापूर तालुक्यातील रंगवली नदीला छोटेखानी पूर आला आहे. तर धुळे जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक घरांची पडझड झाली. 

गेल्या १८ दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र आज आलेला पाऊस पिकांना संजीवनी देणारा ठरला असून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.