तुळजापुरात जोरदार वादळी पावसाचा तडाखा

वादळी वा-यामुळे तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावाला जोराचा फटका बसलाय. 

Updated: Apr 15, 2018, 03:50 PM IST
तुळजापुरात जोरदार वादळी पावसाचा तडाखा title=

सोलापूर : आज पहाटे झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावाला जोराचा फटका बसलाय. अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेलेत. विजेच्या तारा तुटून पडल्यात. शिवारातील झाडं उन्मळून पडलीत. आंब्याचं मोठं नुकसान झालंय. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर झाडं पडल्यानं अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालंय.

सुदैवानं या वादळी पावसात कोणतिही जीवितहानी झालेली नाही..  तहसील कार्यालयाच्या स्थानिक कर्मचा-यांकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचं काम सुरु करण्यात आलंय.