होळीच्या मुहूर्तावर राजापूरच्या गंगेचं आगमन; पहिल्यांदा केव्हा अवतरलेली गंगा? शिवबांशी आहे खास नातं

Konkan News : कोकणच्या भूमीवर पाय ठेवला की या ठिकाणाचं आपल्याशी पूर्वापार चालत आलेलं नातं आहे असाच भास सर्वांनाच होतो. अशा या कोकणात राजापूरच्या गंगेचं आगमन झालं आहे.   

सायली पाटील | Updated: Mar 26, 2024, 09:10 AM IST
होळीच्या मुहूर्तावर राजापूरच्या गंगेचं आगमन; पहिल्यांदा केव्हा अवतरलेली गंगा? शिवबांशी आहे खास नातं  title=
Rajapurchi Ganga arrives in Ratnagiri district people gathered to see wholey water flow latest news travel maharashtra tourism

Rajapurchi Ganga : कोकणच्या (Konkan) सौंदर्याची आणि निसर्गसृष्टीची सर्वांनाच भुरळ. अशा या कोकणावर ज्याप्रमाणं निसर्गानं मुक्तहस्ताची उधळण केली आहे तसंच या कोकणावर अध्यात्माचीही छाप पाहायला मिळते. कोकणात कैक पुरातन मंदिरं असून, त्यांचं सौंदर्य आणि महत्त्वं कायमच भारावणारं ठरतं. अशा या रम्य कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या राजापूरात यंदाच्या वर्षी नुकतंच गंगेचं आगमन झालं आहे. 

मागच्या काही दिवसांपासून हवेतील तापमानात वाढ होऊन पाण्याची समस्या सतावणार असं वाटत असतानाच हुताशनी पौर्मिमेच्याच दिवशी पहाटेच्या सुमारास राजापुरातील उन्हाळे येथे असणाऱ्या गंगातीर्थ क्षेत्री गंगेचं आगमन झालं. गेल्या काही वर्षांमध्ये राजापुरातील गंगेचं आगमन-निर्गमन सातत्याने बदलत असल्याची बाब यावेळी समोर आली. यावेळी जेमतेम सहा महिन्यांच्या कालवधीनंतर गंगामाईचं पुनरागमन इथं झालं. 

कोकणातील शिमगोत्सवाच्या (Holi 2024) काळात किंवा त्यानंतर गंगामाईचे आगमन किंवा वास्तव्य सुरु राहिल्यास या भागात असणाऱ्या अनेक ग्रामदेवतांच्या पालख्यांची आणि गंगामाईची भेट घडवून आणण्याची प्रथा आहे. यंदाही हे चित्र इथं पाहायला मिळू शकतं. दरम्यान, गंगेचं आगमन नेमकं किती वाजता झालं याची यंदा स्पष्टोक्ती होऊ शकलेली नाही. असं असलं तरीही मंदिरस परिसरात गंगेसह सर्व कुंडांमध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं असल्याची बाब मंदिर प्रशासनानं स्पष्ट केली आहे. 

गंगेच्या आगमनाची दंतकथा आणि काही वैज्ञानिक संदर्भ 

इथं गंगेच्या आगमनासंदर्भात स्थानिकांकडून एक दंतकथा सांगण्यात येते. गंगाजी साळुंखे नावाचे एक गृहस्थ दरवर्षी पंढरपुरात जात असत. पण, वृद्धापकाळामुळं त्यांना तिथं जाता येईना. त्याचवेळी एके दिवशी शेतात काम करत असताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांची आयुष्यभराची सेवा पाहून तिथंच असणाऱ्या एका वटवृक्षाजवळ गंगा प्रकटली. उपलब्ध माहितीनुसार गॅझेटियरमध्येही याचा उल्लेख आढळून येतो. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या 

इंग्रजकालीन अधिकारी सी. जे. विल्किन्सन यांनी कोकणातील भूगर्भरचनेसंदर्भात अभ्यास केला होता. त्यांच्याच अभ्यासाआधारे रत्नागिरीच्या गॅझेटमध्ये राजापूरच्या गंगेचा संदर्भ आढळतो. इथं नमूद केल्यानुसार भूगर्भातील सातत्यपूर्ण हालचालींमुळं हे पाणी सायफन प्रणालीमुळं प्रवाहित होत असावं. मेदिनी पुराणातही राजापूरच्या गंगेचा उल्लेख आढळतो असं म्हटलं जातं. 

काही संदर्भांनुसार साधरण 1394 मध्ये गंगा येण्यास सुरुवात झाली असावी अशी शक्यता आहे. पण, तशा अधिकृत नोंदी नाहीत. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनीही दोनदा गंगास्थान केल्याचा उल्लेख काही बखरींमध्ये आहे. 1661 मध्ये इंग्रजांची राजापूरमध्ये असणारी वखार लुटल्यानंतर महाराजांनी गंगास्थान केलं होतं. तर, 1664 मध्ये गागाभट्टांनी घेतलेल्या ब्राह्मण सभेच्या वेळीसुद्धा ते गंगास्थानासाठी आल्याचं म्हटलं जातं.